भीमरूपी महारुद्र गीत मराठीत | Bhimrupi Maharudra Lyrics in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही मराठीत भीमरुपी महारुद्र गाणे शोधत आहात का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात आम्ही या पोस्टमध्ये पूर्ण गाणे प्रदान करणार आहोत (Bhimrupi Maharudra Lyrics in Marathi). कृपया पूर्ण पोस्ट वाचा

भीमरूपी महारुद्र गीत | Bhimrupi Maharudra Lyrics in Marathi

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना || १ ||

महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे |
सौख्यकारी दुःख हारी धूर्त वैष्णवगायका || २ ||

दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता भव्य सिंदूर लेपना || ३ ||

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका || ४ ||

ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे |
काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भयें || ५ ||
सिग्नेचर लिरिक्स.कॉम

ब्रम्हांडे माइली नेणो आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठील्या बळें || ६ ||

पुच्छ ते मुरडीले माथां किरीटी कुण्डले बरी |
सुवर्ण कटि कासोटी घंटा किंकिणि नागरा || ७ ||

ठकारे पर्वता ऐसा नेटका सड़पातळू |
चपळांग पाहता मोठे महाविद्द्युल्लतेपरी || ८ ||

कोटिच्या कोटि उड्डाणे झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळें || ९ ||

आणिला मागुती नेला आला गेला मनोगतीं |
मनासी टाकिले मागें गतीसी तूळणा नसे || १० ||

अणु पासोनि ब्रह्मंडा एवढा होत जातसे |
तयासी तूळणा कोठें मेरुमांदार धाकुटें || ११ ||

ब्रह्मंडा भोवते वेढ़े वज्र पुच्छे करू शके |
तयासी तूळणा कैचीं ब्रह्मांडी पाहता नसे || १२ ||

आरक्त देखिले डोळां ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढे भेदिले शुन्यमंडळा || १३ ||

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समस्तही |
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करुनिया || १४ ||

भुत प्रेत समंधादि रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें || १५ ||

हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली भली |
दृढ़देहो निःसंदेहो संख्या चंद्रकळागुणें || १६ ||

रामदासी अग्रगण्यू कपि कुळासी मंडणू |
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती || १७ ||

।। इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं श्री मारुतीस्तोत्रं संपुर्णम ।।

निष्कर्ष | Conclusion

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख खूप आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल Bhimrupi Maharudra Lyrics in Marathi आणि त्यासोबत तुम्हाला इतर मनोरंजक माहिती देखील आवडली असेल.

तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच देऊ आणि तुम्हाला हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर करा.

हे पण वाचा-

Leave a comment